कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितली रवींद्र सावंत यांच्या कार्याची आठवण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 2 जून 2021:

कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत नवी मुंबईतील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे आपण जवळून पाहिल्याचं प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी उपस्थितांना सांगितले.

नवी मुंबईतल्या जनसामान्यांना भेडसावणा-या विषयांवर सातत्याने विविध आंदोलने, समस्यांचा पाठपुरावा यामुळे सावंत कॉंग्रेसला उभारी आणण्याचे महत्वपूर्ण काम करत असल्याबद्दलही पटोले यांनी सावंत यांचं कौतुक केले.

पटोले आज नवी मुंबई दौ-यावर असताना त्यांनी रवींद्र सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसच्या प्रवक्त्या लीना निमये, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे चिटणिस संतोष शेट्टी, तसेच नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या माजी नगरसेविका मिरा पाटील, विजय कुरकुटे,ओबीसी अद्यक्ष नवी मुंबई  संतोष सुतार, प्रल्हाद गायकवाड, सुदर्शन सावंत, सुधीर पांचाळ, डॉ. नूरजॅहा आदि उपस्थित होते.

नुकतेच निधन झालेले वॉर्ड अध्यक्ष सोमनाथ बारवे यांच्या परिवाराला  पटोले यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली. नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निधी स्वखिशातून जमा केला असल्याने नाना पटोले या उपक्रमाने प्रभावित झाले. या कार्यक्रमाचे नियोजन कामगार नेते रवींद्र सावंत, नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
——————————————————————————————————