16 तारखेला चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता
15 मे रोजी गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 14 मे 2021:
अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. लक्षद्वीप इथे 15 तारखेच्या पहाटे तो अधिक तीव्र होऊन 16 तारखेला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ आणखी तीव्र होऊन 18 मे रोजी संध्याकाळी गुजरात आणि त्याच्या बाजूच्या पाकिस्तान किनारपट्टीकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे लक्षद्वीप येथे 16 मे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळमध्ये 13-16 मे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण आणि गोवा येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने या काळात मच्छिमारांनी समुद्रात जावू नये पुन्हा किना-यावर यावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय किना-यावर धडकणारे या वर्षिचे हे पहिले चक्रीवादळ आहे. ‘टाक्टी’ असे या चक्रीवादळाचे नामकरण करण्यात येईल. टाक्टी हे ब्रह्मदेशातल्या सरड्याच्या एका जातिचे नाव आहे.
भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला. तो पुढीलप्रमाणे
14 मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सागरी भागात काही ठिकाणी वीजा आणि वादळी वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता आहे.
15 मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
16 मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा), मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता.
गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर 50-60 किमी प्रतितास ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.
17 मे: गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
18 मे: गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर 40-50 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता.
——————————————————————————————————