- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 25 एप्रिल 2021:
राज्याला द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा यासाठी दुसरी ऑक्सीजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे. ही एक्सप्रेस उद्या नवी मुंबईतल्या कळंबोली रेल्वे स्थानकात दाखल होणार आहे.
गुजरातमधल्या हापा गुड्स शेडमधून 25 एप्रिल रोजी ही कळंबोलीसाठी रवाना करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये तीन ऑक्सीजन टॅंकर असून त्यामधून ४४ टन द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.
काही दिवसांपूर्वी कळंबोली इथून पहिली ऑक्सीजन एक्सप्रेस विशाखापट्टणमसाठी रवाना करण्यात आली होती. या एक्सप्रेसमधील 7 टॅंकरमधून राज्याला 110 टन ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये असलेल्या 7 टॅंकरपैकी 3 टॅंकर नागपूर, 2 टॅंकरनाशिक आणि 2 टॅंकर अहमदनगरला पाठविण्यात आले होते.