3 कोटी 20 लाखाची प्रशासकीय मंजूरी मिळाल्याची जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची माहिती
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- पालघर, २४ एप्रिल २०२१
पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथील आरोग्य सुविधा प्रत्येकी सव्वा टन (१२५ Jumbo Cylinder प्रतिदिन) ऑक्सीजनची लवकरच निर्मिती होणार आहेअसे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार ३ कोटी २० लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या जिल्हा विकास योजनेतून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी पालघर व जव्हारमधील कामाला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला.
उपजिल्हा रुग्णालय, जव्हार व डहाणु ग्रामीण रुग्णालय पालघर या सर्व ठिकाणी कोविड रुग्णालय स्थापन करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
=======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप