- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021:
वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा राज्याला जलद गतीने व्हावा यासाठी 19 एप्रिल रोजी कळंबोली इथून विशाखापट्टणमसाठी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना करण्यात आली होती. विशाखापट्टणम इथं एक्सप्रेसमधील 7 टॅंकरमध्ये 110 मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन घेवून ही एक्सप्रेस आज रात्री मुंबईसाठी रवाना होणार आहे,
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात रुग्णांना जलद ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने रो रो सेवेच्या माध्यमातून ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेसने आज वाराणसीमार्गे लखनौ ते बोकारो असा प्रवास सुरु केला आहे. ही एक्सप्रेस उत्तरप्रदेशाला वैद्यकिय ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे. या गाडीच्या जलद प्रवासासाठी, लखनौ ते वाराणसी दरम्यान ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ही ट्रेन 270 किमीचे अंतर ताशी 62.35 किमी प्रतीतास या वेगाने चार तास 20 मिनिटात पूर्ण करू शकेल.