शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्वीट
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, २० एप्रिल २०२१
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या १० वीच्या परिक्षा म्हणजेच एसएसीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. याबाबतचे ट्वीट करीत १० वीच्या परिक्षा रद्द झाल्याबाबतचा निर्णय जाहीर केला.
Given the worsening situation of the #Covid-19 pandemic, the Maharashtra government has now decided to CANCEL the state board exams for class 10th. Health & safety of students & teachers is our topmost priority.#ssc#hsc#exams
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 20, 2021
राज्यमंत्रीमंडळाची बैठक आज ऑनलाइन पार पडली. या बैठकीत दहावीच्या परिक्षांबाबत चर्चा करण्यात आली. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता दहावीच्या परिक्षाच रद्द करण्यात याव्या, असा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- इतर बातम्यांवरही दृष्टिक्षेप