वैद्यकीय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 18 एप्रिल 2021:
महाराष्ट्राला वैदयकीय ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा यासाठी ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक रेल्वेने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर्स रेल्वेने नेता येऊ शकतील का याची चाचपणी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. त्यानुसार सर्व चाचपणी केल्यानंतर रो रो सेवेच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकर्सची वाहतूक करण्यात येणार आहे. द्रवरूपी वैद्यकीय ऑक्सिजन टँकर्स लोड करण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या कळंबोली / बोईसर रेल्वे स्थानकांमधून रिकामे टँकर्स विशाखापट्टणम आणि जमशेदपूर / रुरकेला / बोकारो येथे पाठवले जातील. त्यासाठी या स्थानकांमध्ये रॅम्प तयार करण्यात आले आहेत. 19 एप्रिल रोजी 10 रिकामे टँकर पाठवण्यासाठी तात्पुरता वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे.
रेल्वेने वैद्यकीय ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी विविध ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.काही ठिकाणी पुलांवरील रस्ते (आरओबी) आणि ओव्हर हेड इक्विपमेंट्स (ओएचई) च्या उंचीच्या निर्बंधांमुळे , विविध आकाराच्या रस्ते टँकरपैकी 1290 मिमी उंची असलेल्या फ्लॅट वॅगन (डीबीकेएम) वर ठेवता येतील. या डीबीकेएम वॅगन्स 15 एप्रिल रोजी मुंबईतील कळंबोली इथल्या +शेडमध्ये ठेवण्यात आल्या होत्या आणि एलएमओ भरलेला टी 1618 टँकरही येथे आणण्यात आला होता. उद्योग आणि रेल्वेच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे मोजमाप घेतली. या मोजमापाच्या आधारे, मार्गाबाबत मंजुरी घेण्यात आली आणि ओव्हरहेड क्लीयरन्सनुसार काही मार्गांवर वेगावर मर्यादा घालून रोरो वाहतूक करणे शक्य होणार असल्याचे आढळून आले.
आज 18 एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेच्या बोईसर येथे एक चाचणी आयोजित केली होती , ज्यात एक लोडेड टँकर एका फ्लॅट डीबीकेएमवर ठेवला होता आणि सर्व आवश्यक मोजमापे घेतली गेली. विविध ठिकाणी टँकर हलविण्याच्या दृष्टीने रेल्वेने कळंबोली आणि अन्य ठिकाणी डीबीकेएम वॅगन यापूर्वीच तयार ठेवल्या आहेत.
——————————————————————————————————-इतरही बातम्यांचा मागोवा