न्यायमूर्ती एन.व्ही.रामणा देशाचे नवे सरन्यायाधीश

 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2021:

सर्वोच्च न्यायालयाचे नवे न्यायाधीश म्हणून नुथलापाटी वेंकटा रामणा  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे 23 एप्रिल रोजी निवृत्त होत असल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 48 वे सरन्यायाधीश म्हणून रामणा यांची नियुक्ती केली आहे. 24 एप्रिल रोजी न्यायमूर्ती रामणा हे  सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.

आंध्र प्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून सेवा देण्यापूर्वी न्यायमूर्ती रामणा यांनी हैदराबाद येथील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात विविध सरकारी संघटनांचे पॅनेल वकील आणि रेल्वेचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणून काम केलं आहे.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालय , केंद्रीय आणि आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरण आणि  सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे.  त्यांनी घटनात्मक, नागरी, कामगार, सेवा आणि निवडणुकांच्या विषयांवर विशेष काम केले आहे .

————————————————————————————————————————————-