सिध्देश्वर जलकुंभ दुरुस्तीकाम 20 मार्च ते 5 एप्रिल पर्यत सुरू राहणार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 19 मार्च 2021:
उथळसर प्रभागसमिती अंतर्गत सिध्देश्वर जलकुंभाचा जलकुंभ क्र. 2 च्या जलकुंभ टाकीच्या अंतर्गत छताच्या भिंतीचे संरक्षणात्मक दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाचा कालावधी 15 दिवसांचा असून दिनांक 20/03/2021 ते दिनांक 05/04/2021 या कालावधीपर्यत दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे.
या कालावधीत उथळसर प्रभागसमिती क्षेत्रातील खोपट, गोकुळदासवाडी, हंसनगर, परेरानगर, रमाबाई आंबेडकरनगर, लॉरी स्टॅन्ड, चरईतील धोबी आळी, आंबेडकर रोड, चंदनवाडी, पाचपाखाडी, नितिन कंपनी, सर्व्हिस रोड, पाटीलवाडी, भोलाभय्या चाळ, नुरीबाबा दर्गा रोड, अल्मेडा सिग्नल, कोलबाड, विकास कॉम्प्लेक्स व गोकुळनगर या शहरातील परिसरात 20 मार्च 2021 ते 05 एप्रिल 2021 या कालावधीत बायपास पासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा दाब कमी असणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.