४ खासगी रूग्णालयांचाही समावेश
महिला दिनानिमित्त ५ केंद्रांवर महिलांसाठी विशेष लसीकरण
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 8 मार्च 2021:
कोविड 19 लसीकरणासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलीं असून ४ खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान जागतिक महिलादिनाच्या औचित्य साधून शहरात आजच्या दिवशी पाच लसीकरण केंद्रांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती.
- महापालिकेची कोविड लसीकरण केंद्रे-
महापालिकेच्यावतीने ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पोस्ट कोव्हीड सेंटर, मेंटल हॉस्पिटल, कौसा हॉस्पिटल, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, वाडिया, किसननगर, रोसा गार्डेनिया,कौसा आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्निटी, अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर,आझाद नगर आरोग्य केंद्र, बाळकूम आरोग्य केंद्र, सी आर वाडिया आरोग्य केंद्र, गांधी नगर, कळवा,कौसा आरोग्य केंद्र, किसन नगर, लक्ष्मी चिराग नगर आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरेस आरोग्य केंद्र. माजिवडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर, मानपाडा, नौपाडा, शीळ आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, सावरकर नगर आरोग्य केंद्र आणि आनंदनगर आरोग्य केंद्र आदी ठिकाणांचा समावेश आहे.
खाजगी रूग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, काळसेकर रुग्णालय,प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हाईलँड हॉस्पिटल आणि कौशल्य रुग्णालय आदी रुग्णालयांचा समावेश आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज पाच लसीकरण केंदेरांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती. यामध्ये सी. आर. वाडिया, किसननगर आरोग्य केंद्र, लोकमान्य आरोग्य केंद्र, कोरस, रोझा गार्डिनिया आणि कौसा आरोग्य केंद्र आदींचा समावेश होता.
——————————————————————————————————