नवी मुंबई महापालिका निवडणूक रणधुमाळी
- अविरत वाटचाल न्यूज जनेटवर्क
- नवी मुंबई, 24 फेब्रुवारी 2021
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारुप मतदार यादयांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे स्पष्ट करीत नागरिकांनी तब्बल 3 हजार 497 हरकती/सूचना दाखल केल्या आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत असंख्य त्रुटी असून एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर या प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीवर 16 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नागरिकांकडून हरकती / सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रसिध्द केलेल्या प्रारूप मतदार यादीवर नागरिकांच्या एकूण 3497 हरकती / सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोग यांचे पत्र क्र. रानिआ / मनपा-2020 / प्रक्र.3 / का.5, दि. 02 फेब्रुवारी 2021 अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2021 मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे.
====================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप