- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, ५ जानेवारी २०२१
ठाणे शहरातील जय संतोषी माता महिला बचत गटाच्या संचालिका जयश्री कराळे यांनी सन २००८ या वर्षी १२ महिला सदस्य मिळून ठाणे महानगर पालिकेत नोंदणीकरुन बचत गटाची स्थापना केली.खाजगी बॅकेकडून त्यांनी कर्ज घेऊन त्यात त्यांनी जेवण बनवण्याचे साहित्य खरेदी केले. गॅस चुला,कढई,मोठे पातेले,झारा,कलथा,भाजीपाला इत्यादी साहित्य खरेदी करुन महानगर पालिका शाळेतील अंगणवाडी ७०० विद्यार्थ्यांना खिचडीचा खादय पुरवठा व इयत्ता १ ली ते १० वी या वर्गातील विद्यार्थांना शाळेत पोषण आहार या योजनेत २००० विद्यार्थांसाठी जेवणाचा ठेका मिळाला आणि या महिला बचत गटाची प्रगती होऊन अर्थिक आलेख उंचावत गेला.
मोकळया वेळेत दुरदर्शन संचावरील बातम्या पाहत असताना महाराष्ट्र शासनाकडून गरीब आणि गरजू यांच्या आहारा करीता “शिव भोजन” अगदी अत्यल्प दरात जेवणाची प्रती थाळी सुरु करण्याची योजना पाहिली या योजनेचा लाभ आपण घेवू शकतो असा मनात विचार आला. दुसऱ्या दिवशी आपल्या बचत गटाच्या महिलांबरोबर चर्चा करुन या योजनेचा लाभ घेण्याचे ठरवण्यात आले.
Watch: Other News On Youtube
या योजनेसाठी उप नियंत्रण शिधावाटप कार्यालय फ परिमंडळाचे उपनियंत्रक अधिकारी एस.आर वंजारी यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून शिवभोजन योजनेचा लाभ घेऊ शकतो त्या प्रमाणे त्यांनी सदर योजनेचे काम पाहणाऱ्या अधिकारी यांच्याकडून विहीत नमुन्यातील अर्ज घेवून कागदपत्रांची योग्य मुदतीत लवकरात लवकर पुर्तता करुन देण्यात आली. सदर योजना बचत गटाच्या नावे मंजूर झाली. ठाण्यातील यशोधन नगर येथील हॅप्पी हाईट्स मधील तळमजळयात शॉप नंबर जी-१ येथे शिवभोजन केंद्र सुरुकरण्यात आले.शासनाच्या नियामाप्रमाणे ५/- रुपये थाळी ( २ चपात्या,१ वाटी भाजी, भात, वरण,) समाविष्ट करुन २०० व्यक्तीना जेवणे देणे सुरु झाले.
Watch: Other News On Youtube
कोरोना विषाणू प्रादुर्भाव ताळेबंदीच्या काळात मजूर,स्थलांतरीत,बेघर,तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादी नागरीकांना या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप