महापालिकेकडून स्वच्छतादूतांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 4 जानेवारी 2020:
दैनंदिन शहर स्वच्छता कार्यात उत्तम कामगिरी करणा-या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 16 स्वच्छतादूतांची मोठ्या आकाराची छायाचित्रं स्वच्छता वाहनांवर झळकविण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या लहान-मोठ्या अशा 125 हून अधिक स्वच्छता वाहनांवर ही छायाचित्र लावण्यात आली आहेत. त्यासाठी 8 विभागातून 1 महिला व 1 पुरूष यांची निवड करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहर दररोज स्वच्छ राखण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणा-या स्वच्छतादूतांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान करणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे. महापालिकेने स्वच्छतादूतांनाच सेलिब्रेटी बनविलेले असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता वाहनांवर ‘निश्चय केला – नंबर पहिला’ या निर्धार वाक्यासह आठ विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छता कार्यात उत्तम कामगिरी करणा-या स्वच्छतादूतांची छायाचित्रे झळकविण्यात आलेली आहेत. नवी मुंबई शहर दररोज स्वच्छ राखण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणा-या स्वच्छतादूतांच्या सेवाभावी कार्याचा यामधून गौरव झाल्याने सर्व स्तरांतून पसंती व्यक्त केली जात होत आहे.
यापुढील काळात ‘देशात नंबर वन स्वच्छ शहराचा निर्धार करीत आम्ही सज्ज झालो आहोत, नवी मुंबईकर नागरिकहो आपणही सज्ज व्हा’ असा नागरिकांना आवाहन करणारा संदेश या वाहनांवरील स्वच्छतादूतांच्या छायाचित्रांतून प्रभावी रितीने व्यक्त केला जात आहे.
——————————————————————————————————