- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २ जानेवारी २०२१
माझी वसुंधरा अभियानांतर्गत शुक्रवारी कोकण भवन येथे कोकण विभागाचे महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हरित शपथ दिली. यावेळी येथील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महसूल आयुक्त यांनी अधिकारी व कर्मचा-यांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी आणि वातावरणातील प्रतिकूल बदलांना प्रतिबंधित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान हे शासकीय कार्यालयापुरते मर्यादित न राहता लोकचळवळ होणे आवश्यक आहे, अशी शपथ कोकण भवन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली.
यावेळी गिरीश भालेराव उपायुक्त (विकास), आदि अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला. याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
=====================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप