वसुंधरा अभियानातही नवी मुंबई अग्रेसर राहील

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांचा विश्वास

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,२ जानेवारी २०२१

उद्यानांचे शहर ही नवी मुंबईची ओळख असून शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची असल्याने शासनाच्या वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने प्रत्येकाने सक्रीय व्हावे असे आवाहन करीत नवी मुंबई महानगरपालिका या अभियानातही अग्रेसर राहील असा विश्वास अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केला.

  • WATCH: OTHER VIDEO ON YOUTUBE
  • मालमत्ता कराबाबत आयुक्त अभिजीत बांगर काय म्हणाले

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वंडर्स पार्क आणि ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे आयोजित ‘वसुंधरा अभियान’ शपथ ग्रहण कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करीत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचेसह उपस्थित सर्वांनी निसर्गातील पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नि या पंचतत्वांच्या संवर्धानासाठी दक्ष राहून कार्य करण्याची सामुहिक शपथ घेतली.

  • WATCH: OTHER VIDEO ON YOUTUBE
  • जीणं सन्मानाचं हव

यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त क्रांती पाटील, उद्यान विभागाचे उपआयुक्त मनोज महाले, मुख्य लेखा परीक्षक दयानंद निमकर, क्रीडा विभागाचे उपआयुक्त श्रीराम पवार, शिक्षण उपआयुक्त योगेश कडुस्कर, इटीसी संचालक वर्षा भगत, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड, परिवहन मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप
  • बघा तांदळापासून पोहे कसे बनतात