वाशी येथे “रॉल्फस् हक्क” संवाद परिषद संपन्न
वाशी खाडी येथील चौथ्या पुलामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमार बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रकल्पग्रस्तांची एकजूठ
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १७ डिसेंबर २०२
नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पुढाकाराने १६ डिसेंबर रोजी सायंकाळी वाशी येथे पालघर, बृहन्मुंबई, ठाणे-बेलापूर पट्टीतील, उरण ते पनवेल पर्यंतच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध मच्छिमार संघटना, संस्था, तसेच अनेक शासनाच्या आणि खाजगी प्रकल्पानमुळे बाधित शेतकरी, मच्छिमार व समाज यांच्या साठी लढणाऱ्या संघटना यांच्या एकत्रित अश्या “रॉल्फस् हक्क” (रॉल्फस म्हणजे Right of Water Bodies, Land, Forest & Sea)संवाद परिषदेचे आयोजन केले होते. नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिषदेत भविष्यात सर्वच संघर्षाचे लढे “रॉल्फस् हक्क” या एकाच नावाखाली हे एकत्र येऊन लढण्याचा निश्चय यावेळी सर्वानुमते करण्यात आला.
सायन – पनवेल महामार्गावर वाशी खाडी येथे चौथा पूल महाराष्ट्र शासनाच्या एमएमआरडीए च्या माध्यमातून उभारण्याचे काम नुकतेच सुरु करण्यात आलेले आहे या पुलामुळे नवी मुंबईतील मूळ आगरी-कोळी-भंडारी व इतर मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका नवी मुंबईतील अनेक गावांतील ग्रामस्थांना बसून त्यांचे कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक व प्राकृतिक जीवनमानावर परिणाम होणार आहे त्यामुळे येथील मच्छीमार बांधवांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून त्यासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने होणाऱ्या परिणामांबाबत पत्रव्यहार करून शासन स्तरावर व सरकार स्तरावर पत्रव्यवहाराद्वारे समस्या व शासनाकडून झालेला अन्याय लक्षात आणून दिलेला आहे.
तरीदेखील शासनाने या चौथ्या पुलाचे काम सुरु ठेवलेले आहे. या कामाला विरोध दर्शविण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाचे व सरकारचे लक्ष वेधले होते. यासर्व पार्श्वभूमीवर काल झालेल्या वाशी येथील वरील उल्लेखिलेल्या सर्व पट्ट्यातील, क्षेत्रांतील सर्वच संघटना एकत्र येऊन या संवाद परिषदेत या प्रकल्पामुळे बाधा होणाऱ्या व बाधित होणाऱ्या आजच्या व भविष्यातील घटकांचा वेध घेऊन सर्वच संघटना व त्यांच्या संघर्षशील नेत्यांनी एकत्र येऊन मोठ्या शक्तीनिशी या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्धार एकमुखाने ठरावाद्वारे संमत करण्यात आला.
मच्छिमारी व्यवसायात जो मच्छीमार बांधव व भगिनी जे दिवसाला हजार रुपये कमवितात अशांना १५ लाख रुपये नुकसान भरपाई, आधुनिक जेट्टी आणि व्यापारी गाळे, सरकारी नोकऱ्या याची मागणी मांडण्यात आली.
यावेळी जमलेल्या सर्वच मच्छीमार व प्रकल्पग्रस्त संघटना या वाढवण बंदराच्या लढ्यात सोबत राहून थेतील बाधित होणाऱ्या मच्छीमार बांधवांना पाठिंबा व वेळेवेळी त्यांच्या आंदोलनांत सहभागी होण्याच्या ठराव देखील सर्वानुमते पारित करण्यात आला.
यापुढील अशीच संवाद व समन्वय परिषद जानेवारीत उरण येथील करंजा याठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
रॉल्फ़्स हक्क “ Right of Water Bodies, Land, Forest & Sea संवाद परिषदेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी- चेअरमेन नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन्स, श्री.चंदू दादू पाटील -अध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस- मच्छीमार सेल, ऍड.सुरेश ठाकूर -अध्यक्ष- नवी मुंबई ९५ गाव व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, अब्दुल राशिद सोलकर- उपाध्यक्ष नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमॅन्स, विकास मोतीराम कोळी- राष्ट्रीय अध्यक्ष- बिझिनेस फोरम- नेफ इंडिया, केसरी तरे- सरचिटणीस नेफ महाराष्ट्र, अशोक पराडकर- -उपाध्यक्ष मच्छिमार सेल रा .कॉं. पक्ष महाराष्ट्र प्रदेश, मनोहर पाटील-अध्यक्ष-सिडको एमआयडीसी (MIDC) प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, जयेश आकरे-अध्यक्ष- आगरी कोळी भंडारी इस्ट इंडियन आदिवासी सागरी जमीन परिषद, संवाद परिषदेचे यजमान नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत, सौ राजश्री भगवान पाटील,अध्यक्ष- मच्छीमार सेल उत्तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस, दीपक पाटील- कार्याध्यक्ष ९५ गाव व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती ठाणे जिल्हा, राजाराम पाटील-अध्यक्ष-आगरी समाज शेतकरी प्रबोधन, श्री सीताराम नाखवा -अध्यक्ष- करंजा पारंपारिक मच्छिमार संघटना, के. एल. कोळी- अध्यक्ष-प्रगती मच्छिमार सह.संस्था करंजा-उरण, शशिकांत डोंगरे- अध्यक्ष- स्वर्गीय दि बा पाटील प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटना पनवेल, मा विश्वरथ नायर- वरिष्ठ पत्रकार,श्री सुधाकर पाटील-अध्यक्ष- उरण सामाजिक संस्था, विजय वरळीकर-नेफ महाराष्ट्र, प्रकाश तोरणकर- भंडारी समाज नेते, दिवाळे गाव येथील ज्ञानेश्वर गणपत माळी, जगन्नाथ बाये,रामचंद्र अंबाजी पाटील, चंद्रकांत बाये, अविनाश ज्ञानेश्वर बाये, धर्मा गणपत बाये, निकेश जगन्नाथ बाये, सुरेश पाटील- जुईपाडा, शशिकांत ठाकूर-जुहूगाव, युवा नेते निशांत भगत, समाज सेवक संदीप भगत, शैलेश घाग, सुरज देसाई, कार्यक्रमाचे समन्वयक हरीश सुतार व सागर कोळी यांच्या सह बाधित होणाऱ्या २७ गावांतील मच्छिमार बांधव हे या संवाद परिषदेस उपस्थित होते.
======================================================
मागील इतर बातम्यांचाही मागोवा