सीवूड येथे पोलीस अधिकारी, महिलांसह 91 दात्यांचे रक्तदान

एक जीव वाचविण्यासाठी संकल्पनेअंतर्गत महारक्तदान शिबिराचे आयोजन

भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत जाधव यांचा उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १५ डिसेंबर २०२०

भाजपा  माजी नगरसेवक  भरत जाधव  यांनी एक स्पर्धा जीव वाचवण्यासाठी या संकल्पनेअंतर्गत महारक्तदान सप्ताह आयोजित केला  होता. 13 डिसेंबर रोजी सेक्टर 48A विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी, महिलांसह ९१ दात्यांनी रक्तदान केले. तर 60 पेक्षा जास्त रक्तदाते शुगर ब्लड प्रेशर डायबिटीस कोरोना किंवा अन्य आजारामुळे रक्तदान करू शकले नाहीत. त्यातील 30 महिलां पैकी 25 महिला हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे रक्तदान करू शकला नाही. पुढील काळात महिलांच्या हिमोग्लोबिन वाढीकरिता विशेष प्रयत्न केले जाणार असून भविष्यात फक्त महिलांचे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भरत जाधव यांनी दिली.

या रक्तदान शिबिरामध्ये NRI सागरी पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, माजी नगरसेविका कविता भरत जाधव यांच्यासह अनेकांनी या रक्तदानात भाग घेतला.

या रक्तदान शिबिराला करिता नो बॅनर नो पोस्टर नो पत्रक नो जाहिरात तरी देखील न भूतो न भविष्यती असा प्रचंड प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला. यामध्ये वैयक्तिक प्रसार, माध्यम व माझे सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे असे भरत जाधव यांनी व्यक्त केले.

रक्तदान शिबिर संपल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांचा ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये प्रथम पारितोषिक रु 5555 सागर देसाई,  द्वितीय पारितोषिक रु 3333 रमेश पवार व तृतीय पारितोषिक रु 1111 दीपक शहा यांना मिळाले असून प्रत्येक रक्तदात्यांना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आलेली होती.

===================================================

  • मागील इतर बातम्यांचाही मागोवा