अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी केली तुर्भे विभागातील स्वच्छता कामाची पाहणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ७ डिसेंबर २०२०

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ च्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये केलेल्या सूचनांनुसार प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात करण्यात आलेली आहे. त्यामुसार अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी काल तुर्भे विभागातील स्वच्छतेची पाहणी करीत आढावा घेतला.

याप्रसंगी , घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  सुबोध ठाणेकर, कार्यकारी अभियंता मनोज पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते.

परिसर स्वच्छतेप्रमाणेच प्रामुख्याने मोराज सर्कल सानपाडा, स्व. सिताराम मास्तर उद्यान, पिंपळपाडा, सानपाडागांव, आनंदनगर, हनुमान नगर, आंबेडकर नगर, इंदिरानगर परिसरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाच्या स्वच्छतेची पाहणी करीत त्याठिकाणी अधिक स्वच्छतेविषयी सूचना देण्यात आल्या. स्वच्छतेविषयी केलेल्या सूचनांची पूर्तता एक आठवड्याच्या कालावधीत करण्याविषयी संबंधितांना सूचित करण्यात आले.

=======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा