आयएनएस ऐरावतमार्फत सुदानला 100  टन अन्नधान्याची मदत

  • अविरत वाटचाल
  • नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2020

भारतीय नौसेनेने सुरू केलेल्या मिशन सागर-2 या उपक्रमाचा एक भाग म्हणून नौसेनेचे आयएनएस ऐरावत हे जहाज अन्नधान्याची मदत घेऊन 2 नोव्हेंबर रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले. भारत सरकारतर्फे 100 टन अन्नधान्याची मदत आयएनएस ऐरावतमार्फत पाठविण्यात आली आहे.

भारत सरकारच्या वतीने आपल्या मित्र देशांना नैसर्गिक आपत्ती आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे. मिशन सागर-2 मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला मे-जून 2020 मध्ये प्रारंभ झाला. यानुसार भारताने मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मेदागास्कर आणि कोमोरोस येथे अन्नधान्याची आणि औषधांची मदत पाठविण्यात आली. मिशन सागर-2 चा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ऐरावत जहाजामार्फत सुदान, दक्षिण सुदान,  डिबुती आणि एरिट्रिया येथे मदत पाठविण्यात आली आहे.

आपल्या सागरी शेजारी देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि मित्रत्वाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी या देशांना संकटकाळामध्ये मदत करण्यासाठी मिशन सागर-2 सुरू करण्यात आले आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा