निवासी उपआयुक्त सिध्दाराम सालीमठ यांची भारतीय प्रशासन सेवेत निवड

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १० सप्टेंबर २०२०

 कोकण भवन येथील निवासी उपआयुक्त सिध्दाराम सालीमठ यांची भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्यामुळे त्यांचे विभागीय माहिती कार्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले.

  • सालीमठ यांनी कोंकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि पालघर जिल्हयातील प्रसार माध्यमांमध्ये समन्वय राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस दुर्घटना, महाड येथील पूल अपघात, निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय दृष्टीकोनातून त्यांचे योगदान खूप मोठे होते. 
  • विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश व. मुळे, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड मनोज सानप आणि माहिती सहाय्यक प्रविण डोंगरदिवे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

शासनाच्या आदेशानुसार आगामी काळात सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी शासन योजनेचा उपयोग होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सालीमठ यांनी सांगितले.

================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा