करावे ग्रामस्थांकडून सफाई कामगारांचा गौरव

माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आणि समाजसेवक अमित मढवी यांचा पुढाकार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २२ ऑगस्ट २०२०

स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये आपल्या नवी मुंबई महानगर पालिकेला महाराष्ट्रात प्रथम व भारतात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या यशाचे खरे शिल्पकार असणाऱ्या सफाई कामगारांचा करावे ग्रामस्थांकडून जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे सफाई कामगारांनी कृतज्ञता व्यक्त करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे यासाठी अविरत मेहनत करू, अशा विश्वास उपस्थितांना दिला.

करावे गावातील स्थानिक माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आणि जनसेवक अमित मढवी यांच्या कडून करावे गावातील सफाई कामगारांना भेट वस्तू  देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी करावे सिवूडस मंडळ अध्यक्ष जयवंत तांडेल, समाजसेवक प्रसाद तांडेल,जेष्ठ नागरिक चंद्रकांत गिरी,वॉर्ड अध्यक्ष मनोहर पाटील,नवी मुंबई प्रकल्पग्रस्त आगरी कोळी रिक्षा महासंघचे अध्यक्ष प्रसन्न कडू,करावे रिक्षा चालक मालक संघटनाचे अध्यक्ष मच्छिंद्र  तांडेल,भाजपा युवा मोर्चा सचिव नवी मुंबई विनायक गिरी,जयप्रकाश तांडेल,प्रशांत तांडेल,प्रवीण तांडेल,राजन म्हात्रे,प्रकाश मढवी,अधिकारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, स्वच्छतेचे काम करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही समाजसेवक अमित मढवी यांनी सफाई कामगारांना दिली.

===============================================

  • मागील बातम्यांचाही मागोवा