करावे गावातील तनिषा राजेचे दहावीत उत्तुंग यश

९६.२ टक्के गुण मिळवल्याने कौतुकाचा वर्षाव

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २३ जुलै २०२०

नेरुळच्या करावे गाव येथे राहणारी तनिषा तुषार राजे या विद्यार्थीनीने दहावीच्या परिक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. तनिषाला एकूण ९६.२ टक्के मिळाले असून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तनिषा ही कै.नीलकंठ राजे यांची नात आहे. अतिशय हुशार असणारी तनिषा सध्या नेरुळ येथील डीपीएस हायस्कूलची (सीबीएसई बोर्ड) विद्यार्थिनी आहे. तिने मिळवलेल्या उत्तम गुणांमुळे शाळेतील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश आहे.

नियोजबद्धरितीने केलेला अभ्यास, शिक्षकांचे आणि पालकांचे मार्गदर्शन यामुळे आपणाला हे यश मिळाल्याचे तनिषाने सांगितले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीतही असेच यश मिळवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करु, असा विश्वासही तिने व्यक्त केला.

दरम्यान, सध्याच्या स्पर्धेच्या युगात गावातील एका मुलीने दहावीच्या परिक्षेत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल तनिषावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा