- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
उलवे, 13जुलै 2020
देशभर कोरोना महाभंयकर व्हायरसने गेल्या काही महीन्याभरापासून हजारों नागरिकांना ग्रासले आहेत. उलवे परिसरातही नागरिकांना कोरोनाची बाधा होत असून कोरोना चाचणी करण्यासाठी नवी मुंबई किंवा पनवेल येथे जावे लागते.त्यामुळे सिडको प्रशासनाने उलवे येथे कोव्हिड 19 साठी टेस्ट लॅब सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी सिडकोकडे केली आहे.उलवे शहरात स्थानिक परिसरातील नागरिकां बरोबरच देशभरातुन अनेक नागरीक नव्याने राहायला आल्याने बहुतेकांना इतर परिसराची माहीती व ओळख नसल्याकारणाने अनेक नागरिकांत खुप मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण आहे.
त्यामुळे सिडको प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी आणि टेस्ट लॅब सुरू करून उलवे येथील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी पत्राद्वारे सिडको प्रशासनाला केली आहे.
===============================
- इतर बातम्यांचाही मागोवा