- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- पनवेल,३० जून २०२०
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या दोन हजारांच्या वर गेलेली आहे. त्यातच अनेक नागरिक बेजबाबदारपणे विनामास्क घऱाबाहेर फिरत असल्याचे आढळून येच आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून आता दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
अविरत वाटचाल : निसर्गचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी रोहयोतून फळबाग योजना
https://bit.ly/31fr8lP
कामोठे व खारघर वगळता उर्वरित भागात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात होते. मात्र आता दाट लोकवस्तीच्या भागातदेखील रुग्णांचा आढळ होत आहे. लॉक डाऊन शिथिल होत असल्यामुळे लोकांचा संचार वाढला आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन करून देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत.
अविरत वाटचाल : पर्यटन प्रोत्साहनासाठी किनाऱ्यांवर बीच शॅक्स
https://bit.ly/31mFJfz
लहान मोठ्या खरेदी करण्यासाठी घरातील एका पेक्षा जास्त सदस्य बाहेर जात आहेत. यामुळे बाहेरच्या लोकांशी संपर्क वाढला आहे. त्यात ही काही बेजबाबदार नागरिक मास्क चा वापर करत नाहीत. सॅनिटायझर चा वापर करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी चारही प्रभागात विना मास्क फिरणा-या नागरिकांना व दुकानदारांना दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. खारघर, कळंबोली, कामोठे व पनवेल या चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी हे अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई करत करत आहेत.
=======================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा