प्रत्येक गरजू रूग्णाला बेड मिळायलाच हवा

 कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी टीम म्हणून काम करू
ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त विपीन शर्मा
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, २४ जून २०२०

 ज्या कोवीड १९ रूग्णाला बेडची गरज आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत बेड मिळायलाच हवा आणि त्यासाठी ज्या सुविधा निर्माण करण्याची गरज असेल त्या करू असे स्पष्ट करून आपल्याला कोरोनासोबतच राहायचे आहे पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वांनी टीम म्हणून काम करू असा विश्वास नवनियुक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी व्यक्त केला.

विपीन शर्मा यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी सर्व अधिकारी, उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेवून कोरोना कोवीड १९ विषयी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले.

अविरत वाटचाल : मुख्यमंत्र्यांनी केला थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल
https://bit.ly/3dpOOXf

आपण जे चांगले काम करीत आहोत ते सुरूच ठेवणार असून ज्या ठिकाणी जास्त काम करण्याची गरज आहे त्यावर प्रभावीपणे काम करणार असल्याचे सांगितले. ज्या कोवीड १९ रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना बेड उपलब्ध करून देण्यापेक्षा ज्या रूग्णांना बेडची खरी गरज आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत बेड मिळायलाच हवा. त्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे त्या प्राधान्याने निर्माण करू असे सांगितले.

==================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा