- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 10 जून 2020
ठाणे महानगरपालिका स्टेम प्राधिकरण यांच्यामार्फत होणारा पाणीपुरवठा विविध दुरूस्तीच्या कामाकरिता शुक्रवारी 12 जून रोजी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारी 12 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यत घोडबंदर रोड, पातलीपाडा, कासारवडवली, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा व मुंब्रा इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच रात्री 9 ते शनिवार सकाळी 9 वाजेपर्यत सिध्देश्वर तलाव, समतानगर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी, जेलपरिसर, साकेत, ऋतुपार्क इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दोन दिवस कमी दाबान पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांना पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
=====================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा