कोरोनाविरोधातील लढाईत प्राथमिक शिक्षकांचा मदतीचा हात

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १९ मे २०२०

 संपूर्ण देशभरात कोरोना विरोधातील लढाई अत्यंत जिद्दीने लढली जात असून यामध्ये विविध घटक सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रकारची मदत करीत आहेत. यामध्ये महानगरपालिकेत कार्यरत आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांकडून जमा झालेल्या २ लक्ष ७९ हजार २२१ इतक्या किंमतीच्या वैद्यकीय सुविधा साहित्याची वस्तुरूपातील मदत नवी मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आली. या साहित्यामध्ये १५० पी.पी.ई. किट, १२५ वॉशेबल मास्क, ७४१ विविध स्वरूपाची ब्लँकेट्स यांचा समावेश आहे. 

अविरत वाटचाल: पेज लाइक करा. शेअर करा.
https://bit.ly/36eQIIe

 उत्तम संस्कारातून नवी पिढी घडविणा-या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला आदर्श आपल्या मदतीच्या कृतीतून समाजासमोर ठेवला असून या स्तुत्य उपक्रमाचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कौतुक केले. तसेच कोव्हीड  19 उपाययोनांमध्ये शिक्षक पार पाडीत असलेल्या विविध जबाबदारीच्या कामाबद्दल त्यांची प्रशंसा केली. 

यावेळी शिक्षण विभागाचे उपआयुक्त  नितीन काळेशिक्षण विस्तार अधिकारी रूतिका संखेमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ नवी मुंबईचे अध्यक्ष  सांगरनाथ भंडारीराज्य चिटणीस संजय मोरेखजिनदार खुशाल चौधरी व सरचिटणीस आत्माराम आंग्रे उपस्थित होते.
======================================================
  • इतर बातम्यांचाही मागोवा