- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 29 एप्रिल 2020
कोरोनामुळे लॉकडाऊन असतांना सर्व नियम पाळून कोकण विभागात मनरेगा योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 5 हजार 975 कामे सुरु झाली आहेत. त्यात 28 हजार 016 मजूर काम करीत आहेत. आतापर्यंत 283.64 लक्ष रक्कम मजूरी स्वरुपात मजूरांना वाटप करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.
अविरत वाटचाल : पेज लाइक करा. शेअर करा.
https://youtu.be/2pxEUAt1XFE
कोकण विभागात 3 हजार 019 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ज्या ग्रामपंचायतीमध्ये ही कामे सुरु आहेत. त्यांची संख्या पुढीलप्रमाणे ठाणे-136, पालघर-244, रायगड-87, रत्नागिरी-275, सिंधुदूर्ग-288 अशा एकूण 1 हजार 30 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु आहेत.
- अविरत वाटचाल : पेज लाइक करा. शेअर करा.
- https://bit.ly/3cI1tF5
कृषि, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत सुरु करण्यात आलेल्या कामांची संख्या व कामावर उपस्थित मजूरांची संख्या अशी ठाणे-383 कामे 1 हजार 298 मजूर, रायगड-203 कामे 683 मजूर, पालघर 2 हजार 425 कामे 17 हजार 648 मजूर, रत्नागिरी 1 हजार 714 कामे 4 हजार 960 मजूर, सिंधुदूर्ग 1 हजार 250 कामे 3 हजार 427 मजूर संख्या आहे. विभागीय महसूल आयुक्त दौंड यांनी केलेल्या आवाहानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण विभागातील मनरेगा योजनेंतर्गत कामांच्या संख्येत 329 इतकी वाढ झाली असून मजूरांच्या उपस्थिीतीत 3 हजार 131 इतकी वाढ झाली आहे.
=======================================================
इतर बातम्यांचाही मागोवा