महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांसाठी सुविधा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
कल्याण,१७ एप्रिल २०२०
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता ‘मिस कॉल’ व ‘एसएमएस’ करून नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ०२२-४१०७८५०० हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
- जास्तीत-जास्त वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेण्याचे व डिजिटल माध्यमातून वीजबिल भरण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
शिवभोजन पुढील ३ महीने पाच रुपयांत मिळणार
https://bit.ly/3aR9eYJ
- नोंदणीकृत मोबाइलऐवजी इतर क्रमांकावरून ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर ‘मिस कॉल’ दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येईल.
कोरोना संकट : असहाय्य लोगों के मदद के लिए बढे कई हाथ
https://youtu.be/_7pwiDv5edg
- नोंदणी करावयाच्या मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा व ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा.
- या एका ‘एसएमएस’द्वारे तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल अँप अथवा १८००-२३३-३४३५, १८००-१०२-३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो.
- याशिवाय NOPOWER टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवून खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल.
- स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल.
- संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल.
- या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. याशिवाय मोबाईल अँप व टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
========================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा