कोरोना updates : पनवेल मनपाकडून खाजगी प्रकल्पातील १००० फ्लॅट अधिग्रहीत

आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेकडून ठोस उपाययोजना

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • पनवेल,९ मार्च २०२०

सध्या कोरनाचा संसर्ग वाढत असून जसजसे रूग्ण वाढतील तशी ऐनवेळी धावपळ नको यासाठी पूर्वतयारी पनवेल महापालिका प्रशासनाने केली आहे. प्रशासनाने आपातकालीन परिस्थितीत परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी इंडिया बुल्स प्रकल्पातील १००० तयार फ्लॅट अधिग्रहीत केले आहेत.तसेच प्रशासनाने पुरेसे डॉक्टर्स व नर्सेस, रूग्णवाहिका सध्या कार्यान्वित करून महापालिका अधिका-यांना जबाबदारी वाटून दिल्याची माहिती पनवेल प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

  • शिवभोजन पुढील ३ महीने पाच रुपयांत मिळणार
    https://bit.ly/3aR9eYJ

पनवेल महानगरपालिकेने अलिकडे ताप तपासणी केंद्रे सुरू केली आहेत. काही नागरिक कोरोना कॅरियर असू शकतात. ते समोर आले नाहीत तर अनेकांना संक्रमित करू शकतात. म्हणून कोरोनाची लक्षणे असणा-यांनी तपासणी करणे आवश्यक आहे. अशा तपासणीत जर पॉझिटिव्ह रूग्ण आढळला तर त्यास कोव्हिड रूग्णालयात म्हणजेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.   स्वॅब तपासणीदरम्यान त्यांना विलगीकरण करून ग्राम विकास भवन, खारघर व स्वस्थ हॉस्पिटल कळंबोली येथे ठेवणार आहे. निगेटिव्ह रूग्ण हे शक्यतो घरी क्वारन्टाईन असतील.      त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोणताही नागरिक या संकटात सही सलामत राहील याची प्रशासन दक्षता घेत आहे, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

  • रेल्वेने केले २५०० डब्यांचे अलगीकरण कक्षात रुपांतर
    https://bit.ly/3dZ4Etj

दरम्यान,नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. अत्यावश्यक वस्तू घेण्यास गर्दी करू नये. घराबाहेर गरजेशिवाय घराबाहेर पडू नये. जो भाग सील केला आहे तेथे कोणासही बाहेर येण्या जाण्यास मनाई आहे. सायंकाळी पाच नंतर संचार बंदी असल्याने रस्त्यावर व घराबाहेर दिसल्यास कारवाई होईल, असा इशारा पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा