Corona updates : नवी मुंबईत १० फिलिपाइन्स नागरिकांवर गुन्हा दाखल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ५ एप्रिल २०२०

नवी मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग  पसरवल्याबदद्ल नवी मुंबई पोलिसांनी १० फिलिपाईन्स नागरिकांवर महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना २०२० मधील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
    https://bit.ly/2U5Jnq1

वाशी सेक्टर ९ए इथल्या नुरूल इस्लाम ट्रस्टच्या तबलिकी जमात क्रमांक ई १३८ या ठिकाणी नवी मुंबई पोलिसांना कोणतीही माहिती न देता दहा फिलिपाईन्स नागरिक १० ते १६ मार्च दरम्यान राहिले होते. त्यातले सहाजण इतर ठिकाणी गेल्यानंतर ३ जण वाशीतल्या मशिदीतच राहिले होते. या तिघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं. ही माहिती त्यांनी प्रशासनापासून लपवून ठेवली. या दोघांमुळे वाशीतल्या १३ जणांना आणि नेरूळ मधल्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं. या तिघांपैकी ६८ वर्षाच्या एका फिलिपाईन्स नागरिकाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे तर दोघांना नागपाडा इथं क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

  • जनता कर्फ्यू : नवी मुंबईत शुकशूकाट
    https://bit.ly/3bfdWzc
    भारतीय दंड विधान कलम १८८,२६९,२७० विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम स१४, साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३,४, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना २०२० कलम ११ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा