एपीएमसी प्रायोगिक तत्वावर सुरू

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • नवी मुंबई, २६ मार्च २०२०

आजपासून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आलं आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या  उपस्थितीत मार्केटच्या कामकाजाला सुरूवात करण्यात आली.

कोरोना : मुंबईतील महिलेचा वाशी येथील रुग्णालयात मृत्यू
https://bit.ly/39kSasD

आज भाजीपाल्याच्या १५  गाड्यांची आवक झाली आहे. मार्केट परिसरात प्रवेश करण्याआधी  गाडीवर सोडियम हायर्डोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. तसेच व्यापारी, माथाडी, खरेदीदार, बाजार समितीच्या आवारात प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्तिचे थर्मल चेकअप, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं.

मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीवर आरटीओ तर्फे अत्यावश्यक सेवेचे स्टिकर लावण्यात येणार आहेत. त्यासाठी बाजार समितीच्या आवारात मोटार वाहन निरिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.