- अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
- नवी मुंबई, २२ मार्च २०२०
नवी मुंबईतल्या ऐरोली इथं एक करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला आहे. यामुळे नवी मुंबईत करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४ झाली आहे.
ऐरोली इथं राहणारा हा रूग ९ मार्च रोजी परदेशातून नवी मुंबईत दाखल झाला होता. या रुग्णाचे वय ३५ असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बेल्जियम, टर्कि या देशांमधून त्याने प्रवास केला आहे. नवी मुंबईत परतल्यानंतर मात्र त्याने घरीच अलगीकरण करून घेतलं होतं. काल या रूग्णाला ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला त्यामुळे त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. कस्तुरबा रूग्णालयात पाठविलेले त्याचे सॅम्पल पॉझिटिव्ह आढळून आले त्यामुळे आज सकाळी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच त्याच्या कुटुंबियांमधल्या दोघांच्याही चाचण्यांचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
जनता कर्फ्यू : नवी मुंबईत शुकशूकाट
https://bit.ly/3bfdWzc
‘होम क्वारंटाईन’ चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
https://bit.ly/33z3L62
नवी मुंबईत आता १५८ जण घरात अलगीकरण करून राहात आहेत तर ३२ जण महापालिकेच्या वाशी इथल्या अलगीकरण कक्षात दाखल असल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
=====================================================
इतर बातम्यांचाही मागोवा