कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी महापालिकाआयु्क्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 19 मार्च 2020
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका हद्दीतील आय.टी. कंपन्यांच्या व्यवस्थापनांना केवळ अत्यावश्यक अधिकारी, कर्मचारी यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे असे निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिले.याशिवाय इतर अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या निवासस्थानाहून काम करण्याची मुभा द्यावी अशा सूचनाही आयुक्तांनी संबंधित आस्थापनांना केल्या आहेत.
आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह माईंड स्पेस आय टी पार्कला भेट देत त्याठिकाणी पाहणी केली व अत्यावश्यक स्वरुपाचे काम असणा-या अधिकारी, कर्मचा-यांनाच कामावर उपस्थित राहण्यास सांगावे व उर्वरित कर्मचा-यांना त्यांच्या घरून काम करण्याची मुभा द्यावी असे स्पष्ट केले. याशिवाय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता हॅँड सॅनिटायझर आणि मास्क पुरविण्याबरोबरच कार्यालय परिसराचे दररोज निर्जुंतुकीकरण करुन घ्यावे असेही आयुक्त मिसाळ यांनी आयटी कंपन्यांना सूचित केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गातून पसरत असल्याने सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत आय.टी. पार्कमध्ये हजारोंच्या संख्येने विशेषत्वाने युवा कर्मचारी कार्यरत असल्याने आय.टी. कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी अधिक दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचनाही मिसाळ यांनी संबंधितांना केल्या आहेत.
====================================================
इतर बातम्यांचाही मागोवा