- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवीमुंबई, २९ फेब्रुवारी २०२०
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशीतील एन.एम.एस.ए. स्पोर्ट्स असोसिएशनच्या तरण तलावामध्ये आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या विविध उपक्रमांमध्ये दरवर्षी वाढता सहभाग असून यावर्षीच्या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत नवी मुंबईसह संपूर्ण जिल्ह्यातील 360 हून अधिक जलतरणपटूंनी उत्साही सहभाग घेत जिल्हास्तरीय सहभागाचा विक्रम नोंदविल्याबद्दल नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी सहभागी जलतरणपट्टूंचे अभिनंदन केले.
महापौर जयवंत सुतार यांच्या समवेत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ठाणे जिल्हा जलतरण संघटक व राष्ट्रीय प्रशिक्षक, पंच संतोष पाटील, महाराष्ट्र राज्य जलतरण असो. सचिव किशोर शेट्टी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जलतरणपटू गोकुळ कामथ, जलतरण प्रशिक्षक संकेत सावंत, सागरी जलतरणपटू रूपाली रेपाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
29 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे दोन दिवस चालणा-या या जलतरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 1 मार्च रोजी सायं. 5 होणार आहे. क्रीडा रसिकांनी या जलतरणपट्टूंचे कौतुक करण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
========================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा