मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या १ मार्चच्या वेळापत्रकात बदल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • २९ फेब्रुवारी २०२०

रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेने मेन आणि हार्बर मार्गावर १ मार्च रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळे दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

ठाणे-कल्याण डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत मेगाब्लॉक
  • मुलुंड स्थानकातून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६या काळात डाऊन स्लो मार्गावरील गाड्या मुलुंड आणि कल्याण स्थानकांच्या दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील तसेच ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण मार्गावर थांबविण्यात येतील.
  • सकाळी १०.३९ ते दुपारी ३.६ या काळात कल्याणहून सुटणाऱ्या जलद आणि अर्ध जलद गाड्यांना नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. या वेळापत्रकामुळे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.
  • सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी २.४८  या काळात धावणाऱ्या डाऊन फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा रेल्वे स्थानकांवर थांबणार असून  या गाड्या २० मिनिटे उशिराने धावतील.
  • सीएसएमटीवरून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या काळात सर्व डाऊन आणि अप मार्गावरील गाड्यां १० मिनिटे  आधी पोहोचतील.
  • पनवेल – मानखूर्द अप आणि डाऊन हार्बर सेवा सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक. यामध्ये नेरुळ,बेलापूर-खारकोपर मार्गाचाही समावेश आहे.
  • पनवेल, वाशी, बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी ११.६ ते सायंकाळी ४.३८ पर्यंत आणि सीएसएमटीकडून वाशी, बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी १०.३ ते सायंकाळी ४.८ या काळात रद्द करण्यात येणार आहेत.
  • पनवेलहून ठाण्याला जाणाऱ्या ट्रान्सहार्बर सेवा सकाळी १०.१२ ते सायंकाली ४.२६ या काळात  तसेच पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या ११.१४ ते सायंकाळी ४ या काळात गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
  • नेरुळ, बेलापूरहून खारकोपरला जाणाऱ्या गाड्या सकाळी ११.२ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत तसेच खारकोपरहून नेरुळ, बेलापूरकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.४५ या काळात रद्द करण्यात आल्या आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात पनवेल-अंधेरी सेवाही रद्द करण्यात आली आहे.
  • दरम्यान, मोगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी- मानखूर्ददरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी, नेरुळ दरम्यानही विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

===================================================

इतर बातम्यांचाही मागोवा