अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
27 फेब्रुवारी 2020, नवी मुंबईः
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी नवी मुंबईमधल्या नागरिकांनी एकत्र येवून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं आहे. वाशीच्या मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या वतीने निलेश पालेकर यांनी वाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण केलं आहे. या एकदिवसीय उपोषणादरम्यान ते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी नवी मुंबईमधल्या एक लाख नागरिकांच्या स्वक्ष-याही घेत आहेत. नागरिकांचाही सहभाग या मोहिमेसाठी पाहायला मिळत आहे.
या उपोषणात मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, कार्यवाह मधुकर राऊळ, परशपराम ठाकूर, पटील तसेच अनेक सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत.
——————————————————————————————————
इतरही बातम्यांचा मागोवा
बघा पोहे कसे तयार होतात.