मराठी ही शक्ती आणि भक्तीची भाषा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

27 फेब्रुवारी 2020, मुंबईः

भाषा संस्कारातून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषा दिन चिंतेत का साजरा करतो. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची. असे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अशा भाषेची चिंता नको. मराठी भाषेचं वाकडं करण्याची कोणाची टाप आहे असा प्रश्नही आज केला.

कविवर्य वि.वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनानिमित्त आज मराठी भाषा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विधान भवनात राज्य सरकराच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. विधान भवनाच्या आवारात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. तसेच 12 बलुतेदारांचे चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हे सांगणारी भाषा आपली मराठी भाषाच होती. मराठी भाषेला मोगल, मुघल, ब्रिटीश रोखू शकले नाही तर अजून कोण काय रोखणार. मराठी डोंगरकपा-यांवर, दगडांवर. ह्द्यावर  कोरली गेली आहे. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

इतरही जुन्या भाषा आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत नामदेव शाळा का नाही. म्हणून मराठी सक्तीची करावी लागते. मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य व्हायला हवी हा कायदा मी मुख्यमंत्री असताना करता आले हे माझे भाग्य आहे अशा भावनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी व्यक्त केल्या.

या सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सत्ताधारी पक्षांच्या आमदारांसह विरोधी पक्षाचे आमदारही सहभागी झाले होते.

————————————————————————————————————————————-
इतरही बातम्यांचा मागोवा

तळोजा औद्योगिक वसाहतीत बफर झोनची मागणी