सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल किचन योजना सुरू करणार 

  • सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा

सकस आणि गरम अन्न मिळणार

वसतीगृहाचे आधुनिकीकरण आणि cctv ही बसवणार

  • अविरत वाटचाल न्यू नेटवर्क
  • मुंबई,२७ फेब्रुवारी २०२०

सामाजिक न्याय विभागाच्या राज्यातील सर्व मागासवर्गीय वसतीगृहांमध्ये मध्यवर्ती भोजनालय ( सेन्ट्रल किचन )  सुरू करून सकस आहार आणि गरम अन्न विद्यार्थ्यांना देणार  असल्याची घोषणा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात केली.

विधानसभेत आज नागपूर जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याबाबतचा प्रश्न आमदार मोहन मते यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी सेंट्रल किचन योजना सुरू करण्याबरोबरच विभागातील वसतीगृहाच्या बदलाबाबतच्या अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या.

नागपूरातील गड्डीगोदाम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हा मूळ मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वसतीगृहाच्या गृहपालाची बदली करण्यात आली असून वसतीगृहातील भोजन पुरवठादारही बदलण्यात आला असल्याची माहिती सभागृहात दिली.

=================================================

  • इतर बातम्यांचाही मागोेवा