- अविरत वाटचाल न्यू जनेटवर्क
- नवी मुंबई, ८ फेब्रुवारी २०२०
होळी उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या सहाय्याने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते करमाळीदरम्यान या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०१०३९/०१०४० एलटीटी-करमाळी साप्ताहिक
- गाडी क्रमांक ०१०३९ ही गाडी ६,१३,२०,२७ मार्च रोजी रात्री ८.४५ ला एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ला करमाळी स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमाक ०१०४० ही विशेष गाडी ८,१५,२२,२९ मार्च रोजी दुपारी १ वाजता करमाळीहून सुटेल आमि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे- या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकात थांबा देण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०१०४२/ ०१०४१ करमाळी-पनवेल-करमाळी साप्ताहिक
- गाडी क्रमांक ०१०४२ ही गाडी ७,१४,२१ आणि २८ मार्च रोजी सकाळी १०.३० करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.१५ ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१०४१ ही गाडी ७,१४,२१ आणि २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता पनवेलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबेः थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळुण, खेड, माणगाव, रोहा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०१०४३/ ०१०४४ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस
- गाडी क्रमांक ०१०४३ ही गाडी २१ फेब्रुवारी आणि ६ मार्च रोजी मध्यरात्री १.१० ला एलटीटीहून सुटेल आणि त्याचदिवशी दुपारी १२.३० करमाळी स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१०४४ ही गाडी २१ फेब्रुवारी आणि ६ मार्च रोजी दुपारी १ वाजता करमाळी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे –ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
=====================================================
इतर बातम्यांचाही मागोवा