- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २३ जानेवारी २०२०२
कोकणातील अंगणेवाडीची जत्रा आणि साप्ताहिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. एलटीटी, पनवेल ते सावंतवाडी रोड, थिविम ,करमाळीदरम्यान या विशेष गाड्या १४ फेब्रुवारीपासून चालविण्यात येणार आहेत.
अंगणेवाडीसाठी विशेष गाड्या
१.गाडी क्रमांक ०११६१/ ०११६२ एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी विशेष (साप्ताहिक)
- गाडी क्रमांक ०११६१ एलटीटी-सावंतवाडी रोड ही विशेष गाडी १४ फेब्रुवारी मध्यरात्री १.१० ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०११६२ सावंतवाडी रोड-एलटीटी ही विशेष गाडी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० ला सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
२.गाडी क्रमांक ०११५७/०११५८ एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी विशेष (साप्ताहिक)
- गाडी क्रमांक ०११५७ ही विशेष गाडी १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १.१० ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०११५८ ही विशेष गाडी १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.२५ ला एलटीटीला पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
३.गाडी क्रमांक ०११५७/०११५८ एलटीटी-थिविम-एलटीटी विशेष (साप्ताहिक)
- गाडी क्रमांक ०११५७ ही विशेष गाडी १४ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४५ ला एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० ला थिविम स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०११५८ ही विशेष गाडी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.५५ ला थिविमहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.२० ला एलटीटीला पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकात थांबा देण्यात आला आहे.
४. गाडी क्रमांक ०११६०/ गाडी क्रमांक ०११५९ थिविम-पनवेल-थिविम विशेष (साप्ताहिक)
- गाडी क्रमांक ०११६० ही विशेष गाडी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.२० ला थिविमहून सुटेल आमि त्याच दिवशी रात्री ११.१५ ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०११५९ ही विशेष गाडी १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२.५५ ला पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ११ वाजता थिविमला पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापुर रोड, रत्नागिरी, चिपळुण, माणगाव आणि रोहा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
साप्ताहिक विशेष गाड्या
१.गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२ एलटीटी-करमाळी-एलटीटी विशेष (साप्ताहिक)
- गाडी क्रमांक ०१०५१ ही विशेष गाडी ३१ जानेवारी, ७,२१ आणि २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४५ ला एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० ला करमाळी स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१०५२ ही विशेष गाडी २,९,२३ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी दुपारी १ वाजता करमाळीहून सुटेल आमि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० ला एलटीटी स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांत थांबा देण्यात य़ेणार आहे.
२.गाडी क्रमांक ०१०१६/०१०१५ करमाळी-पनवेल-करमाळी विशेष (साप्ताहिक)
- गाडी क्रमांक ०१०१६ ही विशेष गाडी १,८,२२ आणि २९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.१५ ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१०१५ ही विशेष गाडी २,९,२३ फेब्रुवारी आणि १ मार्ज रोजी मध्यरात्री १२.५५ ला पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.३० ला करमाळी स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळुण, खेड, माणगाव, रोहा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
==================================================
इतर बातम्यांचाही मागोवा