शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक

  • शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सूर जुळल्यात जमा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, १४ नोव्हेंबर २०१९

राज्यात शिवसेना-भाजप युतीमधील बेबनावानंतर राज्यात नवीन राजकीय समिकरणे तयार होवू लागली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतला असून सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाशिवआघाडीची बैठक नुकतीच संपली आहे.

महाशिवआघाडीच्या या बैठकीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वड्डेटीवार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.

महाशिवआघाडीच्या या बैठकीत एकसूत्री कार्यक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

=====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा