ठाणे जिल्ह्यात १५ उमेदवारांचे  १८ नामनिर्देशनपत्र दाखल, बेलापूरमधून दोघांचे अर्ज

  • वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे,१ ऑक्टोबर २०१९

विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या तिसऱ्या दिवशी  जिल्ह्यात अकरा मतदार संघामध्ये १५ उमेदवारांनी १८ नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

यामध्ये १८ विधानसभा क्षेत्रापैकी १३४ भिवंडी ग्रामीण या मतदार संघात शांताराम तुकाराम  मोरे (शिवसेना),

१३७ भिवंडी पूर्व या मतदार संघात मनोज वामन गुळवी (अपक्ष) डॉ. नरुद्दीन  निझाम अन्सारी (अपक्ष) ,

१३९ मुरबाड  मतदार संघात  प्रमोद विनायक हिंदुराव (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष),

१४० अंबरनाथ मतदार संघात यतिन दत्तात्रय मोरे (अपक्ष),

१४१ उल्हासनगर मतदार संघात ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे (अपक्ष ) यांनी अर्ज दाखल केला. आज अखेर पर्यंत एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

१४२ कल्याण पूर्व मतदार  संघात बालाजी रामदास गायकवाड (अपक्ष), हरिचंद्र दत्तू पाटील (संघर्ष सेना),

१४४ कल्याण (ग्रा) मतदार  संघात सुभाष गणू भोईर (शिवसेना),

१४६ ओवळा-माजिवडा या मतदार संघात प्रताप बाबुराव सरनाईक (शिवसेना ) यांनी चार अर्ज दाखल केले.

१४७ कोपरी-पाचपाखाडी या मतदार संघात  साधना सुधाकर शिंदे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया),

१४९ मुंब्रा-कळवा मतदार संघात महंमद युसूफ महंमद फारुख खान (अपक्ष), फरहत महंमद अमीन शेख (इंडियन युनियन मुस्लिम लीग(अपक्ष)

१५१ बेलापूर मतदार संघात अजय कुमार उपाध्याय (युवा जनकल्याण पक्ष )  संतोष रघुनाथ कांबळे (अपक्ष ) या दोघांनी,  असे एकूण १८ नामनिर्देशन अर्ज दाखल झालेआहेत .

१५० ऐरोली, १४८ ठाणे,१४५ मीरा भाईंदर, १४३ डोंबिवली, १३८ कल्याण (प), १३६ भिवंडी (पूर्व) १३५ शहापूर  या विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन  अर्ज दाखल झाला नाही.

===========================================

इतर बातम्यांचाही मागोवा