- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १ ऑक्टोबर २०१९
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाःभाजप युतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असून भाजपने आपली पहीली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आ. प्रशांत ठाकूर यांनाच तिकीट मिळाले असून त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते तर उरणच्या जागेवर डोळा ठेवून असलेल्या महेश बालदी यांना धक्का बसला आहे. उरण जागा वाटपात शिवसेनेकडे गेला आहे. त्यामुळे उरणधून विद्यमान आ. मनोहर भोईर यांची उमेदवारी कायम राहण्याची चिन्हे आहेत.
पनवेल मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे आ. प्रशांत ठाकूर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पनवेलमध्ये त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार दिसत नसल्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त करण्यात येत आहे. सातत्याने विविध कार्यक्रम घेण्याबरोबरच लोकांशी दांडगा संपर्क ही त्यांची ताकद आहे. त्यांच्याविरोधात शेकाप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप अंतिम नावे जाहीर झालेली नाहीत. तर आ. प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून पनवेलकर पुन्हा त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घालून त्यांची हॅट्रीक पूर्ण करण्याची संधी देतील, अशी चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.
दरम्यान, उरण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र ही जागाच शिवसेनेला गेल्यामुळे बालदी यांच्या हाती निराशा आली आहे. त्यामुळे बालदी यांना आता युतीच्या उमेदवारासाठी मेहनत घ्यावी लागेल, असे बोलले जाते.
दरम्यान, भाजपची अद्याप दुसरी यादी जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत, त्यांना दुसऱ्या यादीत संधी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे.
============================================
इतर बातम्यांचाही मागोवा
बेलारपूरमधून मंदा म्हात्रे तर ऐरोलीतून संदीप नाईक
http://tiny.cc/fs5pdz
==================