- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- पनवेल, 12 सप्टेंबर 2019:
एमआयएम स्टुडंट्स विंगच्या कोकण विभाग निरीक्षक पदी हाजी शाहनवाज खान यांची 11 सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली. एआयएमआयएम महाराष्ट्र स्टुडंट्स विंगचे प्रदेश अध्यक्ष डॉ कुणाल खरात यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खान यांच्या नावाची घोषणा केली.
- राज्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधितक अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ग्रामीण भागाचा विचार करता जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तर खाजगी शाळांमध्ये मोठी लूट सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना शिक्षणाच्या मुलभूत हक्कापासून वंचित रहावे लागत आहे. याव्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्नही अनेक आहे. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सर्व विषयांवर एमआयएमची विध्यार्थी विंग महाराष्ट्रभर काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्वात मोठा विभाग असणाऱ्या कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये एमआयएमच्या विद्यार्थी विंगचे काम पोहोचवून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी हाजी शहानवाज खान यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी देण्यात आली असून त्याबाबतचे नियुक्ती पत्रही त्यांना देण्यात आल्याची माहिती खरात यांनी दिली.
- आगामी विधानसभा निवडणुकीत स्टुड्स्ट विंगमधील सक्षम उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा खासदार इम्तिहाज जलील यांच्याकडे करण्यात आल्याचेही खरात यांनी यावेळी सांगितले.
- कोकण विभागाचे नवनियुक्त हाजी शहानवाज खान यांनी पक्षाने आपल्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये दौरे काढून तेथील विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेवून सोडविण्याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे हाजी शहानवाज खान यांनी सांगितले.
- येत्या 13 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचेही हाजी शहानवाज खान यांनी अविरत वाटचालशी सांगितले.
दरम्यान, पनवेल उप जिल्हा रुग्णालयाबाबत शाहनवाज खान यांनी प्रश्न उपस्थित केला. रुग्णालयासाठी वापरलेली जमीन ही वफकची, देवस्थानची आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे.मात्र असे असूनही शासनाने येथे हॉस्पिटलची उभारणी कशी केली, असा सवाल हाजी शहानवाज खान यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच याप्रकरणी आपण प्रशासनाकडे विचारणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
==================================================
इतर बातम्यांचाही मागोवा