गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २१ ऑगस्ट २०१९:

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरणान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने कोखण रेल्वे मार्गावर पुणे, एलटीटी, पनवेल ते सावंतवाडी रोड दरम्यान आणखी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाढत्या प्रवाशांची सोय होणार आहे.

  • १.गाडी क्रमांक ०११२१/०१२२२ पुणे जंक्शन-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक टर्मिनस
गाडी क्रमाकं -१२२१ पुणे जंक्शन- सावंतवाडी रोड- लोकमान्य टिळक टर्मिनस (विशेष) ही विशेष गाडी २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१० ला पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडीला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

गाडी क्रमाकं ०१२२२  सावंतवाडी रोड- लोकमान्य टिळक टर्मिनस (विशेष) ही विशेष गाडी ३०ऑगस्ट रोजी पहाटे ५.२० ला सावंतवाडी येथून सुटेल आणि त्याचदिवशी संध्याकाळी ४.५० ला एलटीटीला पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडीला झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव, वैभववाडी, राजापुर रोड, विलवडे, आडीवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळुण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना २२ डबे जोडण्यात येणार असून त्यामध्ये थ्री टायर एसी ७, स्लीपर ५, जनरल ८, २ जनरेटर कार डबे  जोडण्यात येणार आहे.

  • २. गाडी क्रमांक ०१२२३/०१२२४ एलटीटी- सावंतवाडी-पनवेल
गाडी क्रमांक ०१२२३ ही विशेष गाडी  ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.५० ला एलटीटी स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ६.३० ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०१२२४ ही विशेष गाडी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.५५ ला सावंतवाडीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४० ला पनवेल स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडीला झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी,  राजापुर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळुण, खेड, वीर, माणगाव, रोहा या स्थाकात थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना प्रत्येकी २२ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये थ्री टायर एसी ७ डबे, स्लीपर ५, जनरल ८ आणि जनरेटर कार २ डबे असतील.

  • ३. गाडी क्रमांक ०१२२५/01226 पनवेल- सावंतवाडी रोड-पुणे जंक्शन
गाडी क्रमांक ०१२२५ ही विशेष गाडी १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.५५ ला पनवेलहून सुटेल आणि  त्याच दिवशी दुपारी २.१० ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडीला रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संमगेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०१२२६ ही विशेष गाडी १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२० ला सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ७.२५ ला पुणे जंक्शन येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडीला झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापुर रोड, विलवडे, आडीवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळुण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण आणि लोणावळा स्थानकात थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाडीला २२ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये थ्री टायर एसीचे ७, स्लीपर ५, जनरल ८ आणि २ जनरेटर कार डबे असतील.

२५ ऑगस्टपासून विशेष शुल्कासह या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. सेकंड क्लास जनरल डब्यांसाठी तिकीट आरक्षित करण्याची गरज नसून प्रवासाच्या आधी तिकीट काढता येईल. तरी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी या गाड्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य आणि कोकण रेल्वेने केले आहे.

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा