नवी मुंबईकरांसाठी खूश खबर ! मोरबे धरण भरले

  • धरणाचे दोन्ही दरवाजे उघडले
  • यावर्षीही पाणी संकट टळले
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ८ ऑगस्ट २०१९:

नवी मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई शहराला आणि आजुबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणारे महापालिकेचे मोरबे धरण पूर्णपणे भरले असून अधिकच्या पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे दोन्ही दरवाजे आज सकाळी ८.३० वाजता उघडण्यात आले आहे.

  • मोरबे धरणाची क्षमता ८८ मीटर आहे. आज सकाळी धरणात ८८.२० मीटर इतकी पाणी पातळी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने  धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आजचा धरणातील पाणी साठा १९२.८०३ दशलक्ष घन मीटर इतके झाले आहे.
  • पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळे धरणाचे दोन्ही दरवाजे २.९ मीटरने उघडण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास हे दरवाजे पूर्णपणे म्हणजे ३ मीटरपर्यंत उघडण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता मनोहर सोनवणे यांनी अविरत वाटचाल शी बोलताना दिली.
  • पावसापूर्वी मोरबे धरणाची पाण्याची पातळी ७२.३६ मीटरपर्यंत खाली आली होती. त्यामुळे नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट उद्भवले होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने धरण तुडूंब भरले असून नवी मुंबईकरांची पाण्याची यावर्षीची चिंता मिटली आहे.

====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा