अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १७ जुलै २०१९
कोकण विभागीय महसूल आयुक्त पदी शिवाजीराव दौंड यांची नियुक्ती झाली आहे. दौंड यांनी आज पदभार घेतला.
- शिवाजीराव दौंड हे यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी- जिल्हा परिषद जालना, सचिव- राज्य माहिती आयोग, मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, लघूउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, खादी ग्रामोद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदावर काम केले आहे.
- कोकण विभागात पर्यटन आणि फलोत्पादन, बंदर विकास, रायगड किल्ला संवर्धन, मत्स्य व्यवसाय, स्मार्ट सिटी, कुपोषणमुक्ती या क्षेत्रात विशेष काम करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी पदभार घेतल्यानंतर सांगितले.
=======================================================
इतर बातम्यांचाही मागोवा