-
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे बांधकाम विभागास आदेश
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे,११ जुलै २०१९:
खड्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहरातील जाणारे रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत हे न तपासता त्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरण्यात यावे असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधकाम विभागास दिले आहेत. पुढील ३ दिवस शहरातील सर्व रस्त्यावर बांधकाम विभागाकडून तात्काळ खड्डे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात यावी अशा सूचना जयस्वाल यांनी नगर अभियंता यांना दिल्या आहेत.
- गेले काही दिवस सतत पडणाऱ्या सततधार पर्जन्यवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन येत्या तीन दिवसात युद्ध पातळीवर हे खड्डे भरण्यात यावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
- सदरचे खड्डे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सिमेंटने किंवा डांबरचा वापर करून खड्डा भरणे अवघड असल्याने पाऊस सुरु असताना कोल्ड मिक्सचरचा वापर करून भरण्यात येणार आहे.तसेच रस्त्यावरील मोठे खड्डे भरण्यासाठी जेट पॅचर तसेच शक्य तेथे सिमेंट काँक्रीटचा वापर करून खड्डे भरण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
======================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा
कोकणात उपअभियंत्यावर चिखल ओतला आणि पुलाला बांधले
http://tiny.cc/4xk88y