- शाळेतील अभ्यास आणि नियमित सरावाच्या जोरावर उत्तुंग यश मिळवले
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे : दहावीची परिक्षा सुरू होती. पेपर देऊन आला की, तो खेळायला जायचा. लोकांना आश्चर्य वाटायचे. क्लासला जायचा नाही. इतर मुलांप्रमाणे सतत अभ्यास करीत बसलेला नसायचा. त्यामुळे कसं होणार त्याचं, अशी काहीशी भावना अनेकांची व्हायची. पण जेव्हा दहावीचा निकाल हाती आला तेव्हा सगळ्यांनाच त्याच्या बुद्धीमतेचा कस दिसून आला. कारण दहावीच्या परिक्षेत त्याने ९४. ८५ टक्के गुण मिळवले होते. स्मित तवटे असे या मुलाचे नाव. क्लासशिवाय केवळ शाळेत शिकवल्या जाणाऱ्या आणि स्वतःच्या नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले होते. त्याच्या या उत्तुंग यशामुळे परिसरात त्याचे सगळेच कौतूक करीत आहेत.
- शांत आणि मनमिळावू स्वभावाचा स्मित नावाप्रमाणेच होता. ठाण्याच्या वसंत विहार हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या स्मितला खेळाची भारी आवड. बुद्धीबळाच्या सोंगट्यांशी मैत्री असणारा स्मित रोज दोन तास खेळण्यासाठी राखून ठेवत असे. बुद्धीबळात प्राविण्य मिळवलेला स्मित जिल्हास्तरावरील स्पर्धांमध्ये शाळेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे मुलांसह शिक्षकांचाही लाडका आहे.
- दहावीला गेल्यानंतरही त्याने आपल्या दिनक्रमात काही बदल केलेला नाही. दहावीचे वर्ष आहे म्हणून मित्रांनी खासगी शिकवण्या लावल्या. त्याचे मित्र स्मितला शिकवणीबाबत नेहमी विचारायचे. मात्र शाळेतले शिक्षक चांगले शिकवतात. तेवढे मला पुरेसे आहे, असे तो सगळ्यांना सांगायचा. शिक्षकांच्या शिकवण्यावर विश्वास आणि खेळाच्या माध्यमातून मनाची एकाग्रता साधत स्मितने दहावीचा अभ्यास केला. शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार आणि घरच्यांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर दहावीच्या परिक्षेत कोणतेही ग्रेस मार्क्स न धरता स्मितने ५०० पैकी ४७२ गुण मिळवत ९४.४ ची टक्केवारी गाठली. त्याच्या या यशाबद्दल आईवडीलांनीही आनंद व्यक्त केला असून स्मितने मिळवलेल्या यशामुळे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, अशा शब्दात त्यांनी त्याचे कौतूक केले.
दहावी असो की बारावी. मुलांवर परिक्षेचे ओझे न लादता त्यांना मोकळेपणाने वावरू द्या. खासगी शिकवणी आणि सतत पुस्तकात डोके घालून बसण्यासाठी त्यांच्यावर दबाव न टाकता त्यांच्यावर विश्वास दाखवा. म्हणजे आपली मुलेही आपला विश्वास सार्थ ठरवतील, हे स्मितने मिळवलेल्या यशामुळे दिसून येते, हे नक्की.
———————————————————————————–
इतर बातम्यांचाही मागोवा